‘मी देशातली सर्वात शक्तिशाली महिला’: कंगना रनौत

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना रनौत तिच्या चित्रपटांपेक्षाही तिने केलेल्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असते. कंगना तिच्या राजकीय विधानांमुळे अधिकच चर्चेत आणि वादात सापडत असते. मात्र, आता कंगनाने स्वत:लाच देशातली सर्वात शक्तिशाली महिला म्हणवून घेत आणखीन एकदा चर्चेत आली आहे.

कंगना रनौतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रोफाईल स्टोरीजमध्ये एक पोस्ट केली आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात तिच्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेचा संदर्भ देण्यात आला आहे. यासाठी एका वृत्तसंस्थेचं
ट्वीट देखील कंगनानं स्टोरीमध्ये दिलं आहे. या ट्वीटमध्ये देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कंगना रनौतच्या आगामी सर्व सोशल मीडिया पोस्ट सेन्सॉर करण्यात याव्यात, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे, असं म्हटलं आहे.

कंगनानं या ट्वीटचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून पोस्ट करत ‘देशातली सर्वात शक्तिशाली महिला’ असा मेसेज लिहिला आहे. तसेच, कंगनाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा सोशल मीडियाच्या माध्यामातून खुलासा केला आहे. तिने काही दिवसांपूर्वी मुंबई हल्ल्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती आणि त्यानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे तिने यात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा