InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मी फक्त राष्ट्र्वादीचाच – आमदार संग्राम जगताप

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा, सोशल मीडियावर रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. “सोशल मीडियावरील चर्चा या वावड्या असून त्याकडे लक्ष देऊ नका”, असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय.

संग्राम जगताप म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबतच्या वावड्या सुरु आहेत. या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार असं काही दिवसांनी सुरुच असतं. सोशल मीडियावर या चर्चा सुरु असतात. मात्र अशा बातम्यांबाबत सोशल मीडियावर विश्वास ठेवायचा का हा ज्याचा त्याचा भाग आहे. अशा बातम्यांना थारा देऊ नका. मी एखाद्या पक्षात जाणार ही बातमी खरी नाही, त्या बातम्यांना महत्व देऊ नका”

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.