InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

मी असे म्हणाले ही नाही वा असे माझे मतही नाही; पंकज मुंडेचं स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही स्थानिक नेत्याची माझ्यासमोर उभे राहण्याची लायकी नाही, अशी खोचक टीका भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली होती. मंगळवारी धारूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. पण यावर आता पंकज मुंडे यांनी ‘मी असे म्हणाले ही नाही वा असे माझे मतही नाही.’ असे स्पष्टीकरण दिले आहे. आणि कृपया लिहिणाऱ्यांनी माझ्या आत्मविश्वासाला अहंकाराचा make up करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मी असे म्हणाले ही नाही वा असे माझे मतही नाही. या देशात जो सज्ञान आहे ज्याला मतदानाचा अधिकार आहे कायद्याच्या चौकटीत जो योग्य आहे तो नागरिक निवडणूक लढण्यास लायक आहे .. लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे आणि मी लोकशाहीचा सम्मान करते’ अशा शब्दात त्यांनी झी २४ तास च्या बातमीवर रीट्वीट केले आहे. तसेच ‘कृपया लिहिणाऱ्यांनी माझ्या आत्मविश्वासाला अहंकाराचा make up करू नये ..मी जे नाही बोलले ते दाखवण्याची प्रवृत्ती व त्यातील सातत्य मला हे स्पष्ट करण्यास भाग पाडते…’ असे स्पष्टीकरण मिडियाला दिले आहे.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या – 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.