‘राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्याबद्दल मला विशेष वाटत नाही’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवल्याबद्दल मला विशेष वाटत नाही. या प्रकरणाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं.

संजय राऊत म्हणाले की, “मी सुद्धा अनेक वेळा सरकारविरोधात आवाज उठवला आहे. मलाही नोटीस यायला हवी होती. या देशात लोकशाही आहे. जर मी चुकीची गोष्ट केली नसेल तर मी ते सिद्ध करु शकतो. आपल्या तपास यंत्रणेवर चांगले संस्कार आहेत. या यंत्रणांना निष्पक्षपाती काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मी अनेकांची चौकशी होताना पाहिलं आहे, त्यामुळे मला याबद्दल (राज ठाकरेंच्या नोटीसबाबत) काही विशेष वाटत नाही.”

महत्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.