InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजपशी युती होणार का, या फालतू चर्चेत मी जात नाही – उद्धव ठाकरे

शिवसेनेच्यावतीने पंढरपुरात महासभेचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे शिवसेनेने अयोध्येप्रमाणे पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

भाजपशी युती होणार का, या फालतू चर्चेत मी जात नाही. तुमच्या क्लिन चीटशी माझं देणंघेणं नाही, माझ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. मी साकडं घालतोय, की ज्यांनी माझ्या जनतेचं वाकडं केलंय, त्यांचं वाकडं करा हेच जनतेच्या चरणी माझं साकडं आहे. जागावाटप गेलं खड्ड्यात, अशा शब्दांत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply