‘कोण आहेत राहुल गांधी’ मी त्यांना ओळखत नाही, असदुद्दीन ओवैसींचा काँग्रेसवर घणाघात

नवी दिल्ली : देशातील सध्या राजकीय वातावरण खूप तापलेलं आहे. त्यातच आता आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकी येऊन ठेपल्या आहेत. यापैकी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. एका कार्यक्रमात बोलताना एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

तसेच पश्चि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली आहे. ओवैसींना राहुल गांधींच्या नेतृत्वार विश्वास नाही का? असा प्रश्न केला. यावर ओवैसी म्हणाले की, कोण आहेत राहुल गांधी? मी त्यांना ओळखत नाही परंतु तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा की ते कोण आहेत. अशा शब्दात राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर ओवैसी यांनी निशाणा साधला आहे.

तसेच पुढे ओवेसी म्हणाले की, ममाताजींनी इतर राज्यांमध्ये लढत राहावे. आता ममता बॅनर्जी यांना बी-टीम बनवण्यात आले आहे, मी यावर आक्षेप घेतला आहे. बी-टीम असणे हा माझा टॅग आहे. पण आता काँग्रेस त्यांना भाजपाची बी-टीम म्हणत आहे. गोव्यात त्यांचा कसा सामना होईल हे पाहणे मनोरंजक ठरेल, असे ओवेसी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा