संजय राऊत काय बोलतात हे मी गंभीरपणे घेत नाही; सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार

मुंबई : सध्या राज्यात शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या शाब्दिक युद्ध रंगलं आहे. शिवसेनेसोबतची युती आमची ऐतिहासिक चूक होती, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. यावर माध्यमांनी संजय राऊत यांना विचारले असता राऊत म्हणाले कि, भाजपा नेत्यांची मन:स्थिती चांगली नसल्याचं म्हणत टीका केली आहे.

तसेच पुढे राऊत म्हणाले कि, माणसाचं मन भरकटलं की अशी माणसं गांजा प्यायल्यासारखी बोलतात. सुधीर मुनगंटीवार यांना मी अत्यंत संयमी, अभ्यासू नेते समजत होतो. त्यांची विधानसभेतली आणि बाहेरची भाषणं मी पाहातो. पण कुणी कुणाबरोबर जावं आणि कुणी कुणाबरोबर राहावं हा त्यांचा प्रश्न नसून महाराष्ट्रात तीन पक्षांनी काय करायचं ते ठरवलंय”, असं देखील राऊत म्हणाले.

यानंतर आता मुनगंटीवारांनी राऊतांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. संजय राऊत काय म्हणता यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही. संजय राऊत काय बोलतात हे सर्वांना माहिती आहे. डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरा, हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी आहे, पाप केल्याने करोना होतो अशी त्यांची वक्तव्य आहेत. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात हे माध्यमांनीही गंभीरपणे घेऊ नये आणि मीही घेत नाही,” असं म्हणत मुनगंटीवार यांनी राऊतांना टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या