“१० ते १२ वर्ष मी ‘त्या’ समस्येचा सामना करत होतो, अनेक रात्री झोपलो नाही,” सचिन तेंडुलकरचा खुलासा

भारतात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कित्येकजण डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटकरिअरमध्ये आपलं करियर करतात. मात्र, आपल्या क्रिकेट करिअरमध्ये सचिन तेंडुलकरलाही अनेक समस्यांचा सामना करावा लागला. नुकतंच सचिन तेंडुलकरने २४ वर्षाच्या कारकिर्दीतील बराचसा भाग आपण चिंताग्रस्ततेचा सामना केला असल्याचा खुलासा केला आहे. हा आपल्या तयारीचा भाग आहे याची नंतर जाणीव झाल्याचंही सचिनने अनअकॅडमीकडून आयोजित चर्चेदरम्यान सांगितलं आहे.

सचिन म्हणाला की, “काळासोबत माझ्या लक्षात आलं की, खेळासाठी शारिरीक तयारीसोबतच मानसिक तयारीदेखील महत्वाची असते. मैदानात उतरण्याआधीच माझ्या डोक्यात फार आधी मॅच सुरु झालेली असायची. चिंताग्रस्त होण्याचं प्रमाण खूप होतं.”

“मी जवळपास १० ते १२ वर्ष चिंताग्रस्ततेचा सामना केला. अनेक सामन्यांआधी मला झोप लागली नाही. पण यानंतर हा आपल्या तयारीचा भाग असल्याचं मी मान्य केलं. मनाला शांती मिळावी यासाठी मी काही गोष्टी करण्यास सुरुवात केली,” असं सचिन सांगतो. त्या काही गोष्टींमध्ये शॅडो बॅटिंग, टीव्ही पाहणे, व्हिडीओ गेम खेळणे यांचा समावेश होता. सकाळचा चहा करणं देखील मला खेळासाठी तयार होण्यात मदत करत होतं”.

“चहा करणे, कपडे इस्त्री करणे मला खेळाच्या तयारीत मदत करत होते. मी सामन्याच्या एक दिवस आधी बॅग पॅक करत असे. माझ्या भावाने मला हे शिकवलं होतं, नंतर तो सवयीचा भाग झाला. शेवटच्या सामन्यातही मी ही शिस्त पाळली होती,” असं सचिन सांगतो. २०१३ मध्ये २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सचिनने निवृत्ती घेतली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा