“माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार”

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका असं म्हटल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी गेले असता त्यांचा उल्लेख सतत माजी मंत्री असा केला जात होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, दोन ते तीन दिवसात कळेल असं सांगितलं. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

यानंतर यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं. त्यांना राज्यपालपदाची ऑफर आली होती. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांना लगावला आहे. यावेळी ते मुंबईत प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला. चंद्रकांत दादा हे आमचे मित्रं आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. ते म्हणाले माजी मंत्री म्हणू नका. चमत्कार होणार आहे. चंद्रकांतदादा अवतारी पुरुष आहे. चमत्कारी पुरुष आहेत. ते काही तरी चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्मयाची त्यांची वेदना समजू शकतो.मी त्यांना निरोप पाठवला आहे.

तुम्हाला 25 वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावे लागेल. उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार कायम राहणार आहे. त्यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागेला नाही. जीएसटी लागलेला नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल, असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा