चंद्रकांत पाटील तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय : उद्धव ठाकरे

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका असं म्हटल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी गेले असता त्यांचा उल्लेख सतत माजी मंत्री असा केला जात होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, दोन ते तीन दिवसात कळेल असं सांगितलं. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

यानंतर यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. मला कळलंय की चंद्रकांत पाटील तिन्ही पक्षापैकी एका पक्षात प्रवेश करतायत, असा टोला उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं. त्यांना राज्यपालपदाची ऑफर आली होती. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांना लगावला आहे. यावेळी ते मुंबईत प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा