InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘मी केलेलं आंदोलन बाळासाहेब ठाकरेंना आवडलं असतं- नितेश राणे

- Advertisement -

जामीनावर तुरुंगातून सुटल्यानंतर नितेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली आहे. नितेश राणे म्हणाले की, ‘मी केलेलं आंदोलन कोणाला आवडो या ना आवडो, ते बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच आवडलं असतं. तसंच त्यांनी माझ्या पाठीवर शाब्बासकीची थापही दिली असती.’

अभियंत्याला शिवीगाळ आणि चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आमदार नितेश राणे यांना काल (बुधवारी)जामीन मिळाला. त्यानंतर बोलताना नितेश राणे यांनी प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं.

- Advertisement -

ओरोस न्यायालयाने नितेश राणे यांना जामीन मंजूर केला. त्यांच्यासह इतर 18 आरोपींनाही कोर्टाने जामीन मंजूर केलाय. मात्र कोर्टाने त्यांना काही अटीही घातल्या आहेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना दर रविवारी कणकवली पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.