InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘माझ्या शिवाय विधानसभा निवडणूका लढवण्यास सक्षम उमेदवार आहेत’

- Advertisement -

राज्यामध्ये माझ्या शिवाय विधानसभा निवडणूका लढवण्यास सक्षम असे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात ४९ ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवार उभे केले जाणार आहेत. असे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुकीत 49 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. शिवाय आपण स्वतः निवडणूक लढवणार नसल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाची 2 आणि 3 जुलै रोजी दोन दिवसाची राज्य कार्यकारणी झाली. या कार्यकारिणीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. यामध्येच आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी 49 जागा लढवणार असल्याचाही ठराव पास करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.