मी हात जोडतो, लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम पाळा !

बीड : कोरोनाचा वाढलेला प्रभाव लक्षात घेत प्रशासनातील प्रत्येक घटकाने गांभीर्यपूर्वक काम करावे, कोरोनाविरूद्धची ही लढाई निकराची असून, पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे व निर्वानीचे आहेत. जिल्ह्यात कुठेही बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडीसीविर किंवा अन्य कोणत्याही बाबींची कमतरता भासणार नाही, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

“मागील वर्षी बीड जिल्ह्यातील जनतेने प्रशासनाला प्रत्येक निर्णयात सहकार्य केले, त्यामुळे जानेवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नगण्य होती, मात्र गेल्या तीन महिन्यात ही संख्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाने भरमसाट वाढली आहे, मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे, संपूर्ण बीड जिल्हा हेच माझे कुटुंब आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या जीवांचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी मंत्री म्हणून नाही तर, कुटुंबातील सदस्य म्हणून हात जोडतो, लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा”, अशी भावनिक साद यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी जिल्हा वासीयांना घातली आहे.

धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व सर्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा