“संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय”

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका असं म्हटल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी गेले असता त्यांचा उल्लेख सतत माजी मंत्री असा केला जात होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, दोन ते तीन दिवसात कळेल असं सांगितलं. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

यानंतर यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं. त्यांना राज्यपालपदाची ऑफर आली होती. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांना लगावला आहे. यावेळी ते मुंबईत प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते.

संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांनीही विनोदी शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार,’ असं मला कळतंय, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसंच, ‘संजय राऊतांना कोणी फार गंभीरतेने घेत नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे. सध्या चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यातील शाब्दीक चकमक राजकीय वर्तुळात विनोदाचा विषय ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा