‘मी त्या कपड्यांमध्ये मूर्ख दिसते, त्यामुळे मला साडीच नेसायला आवडते’: विद्या बालन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांच्या नवा  ड्रेंड सुरू केला आहे. विद्या प्रत्येक कार्यक्रमात आणि पुरस्कार सोहळ्यात ट्रेडिशनल लूकमध्येच हजेरी लावते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विद्याला तिच्या या फॅशन सेन्सबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले आहे.

विद्याला मुलाखतीमध्ये तु कधी साडीवरील पारंपरिक लूकऐवजी इतर अभिनेत्रींसारखा ग्लॅमरस लूक ट्राय केला आहे का?’, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर विद्याने उत्तर दिले, ”मी अनेकदा इतर अभिनेत्रींसारखे कपडे घालण्याचा प्रयत्न केला पण त्या कपड्यांमध्ये मी मूर्खासारखी दिसत होते. त्या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल नव्हते. इतर अभिनेत्री अशा प्रकारचे ड्रेस खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करतात. पण मला ते जमत नाही. मला साडीच नेसायला आवडते.”

पुढे विद्या म्हणाली, “मी एकेदिवशी असे ठरवले होते की मला जे कपडे घालायला आवडतात तेच मी घालेन, मला जे करायला आवडेल तेच मी करेल आणि मला जे बोलायचे आहे तेच मी बोलणार. मला हे सर्व करायचे स्वातंत्र आहे. असं केलं तर लोकांकडे तुमचे कौतुक करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असं उत्तर विद्याने या मुलाखतीत दिले. विद्याने दिलेले हे उत्तर चाहत्यांच्या भरपुर पसंतीस उतरले आहे. तसेच तिचे कौतुक देखील होत आहे.

काही दिवसांपूर्वी विद्याचा ‘शेरनी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तिच्या या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळली होती. लवकरच विद्या दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांच्या नव्या चित्रपटात काम करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा