“भारतातील मिरच्या मला फार आवडतात, मी हव्या तितक्या मिरच्या खाऊ शकते” : प्रियंका चोप्रा

मुंबई : बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा आता भारतात राहत नसली तरी भारताविषयीचं तिला असलेलं प्रेम ब-याचदा ती आपल्या सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून व्यक्त करीत असते. असाच सध्या प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि तिच्या लाखो चाहत्यांनी त्यावर तिचं कौतूक केलं आहे.

कॅनडाची प्रसि्द्ध युट्युबर, कॉमेडियन लीली सिंग हीच्या घरी दिवाळी निमित्ताने एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या पार्टीत बॉलीवूड-हॉलीवूडचे अनेकजण उपस्थित होते आणि प्रत्येकजणानं भारतीय परंपरेविषयी काय आवडतं याविषयीचे आपले विचार व्हिडीओत बोलून दाखविले आहेत. या व्हिडीओत आपल्याला दिसेल की जेव्हा प्रियंकाला भारताविषयी काय आवडतं असं विचारलं गेलंय तेव्हा लगेचच तिने कॅमे-याच्या दिशेने फ्लाईंग कीस दिलाय आणि लगेचच ती मोठ्याने हसत म्हणतेय,”भारतात मिरच्याही खूप आवडीने खाल्ल्या जातात ते मला फार आवडते. मी ही हव्या तितक्या मिरच्या खाऊ शकते. मी भारतीय आहे”.

पार्टीचं आयोजन केलेल्या लीली सिंगनेही आपल्या मांग टिक्कयाकडे लक्ष केंद्रित करून भारताची परंपरा आपल्याला आवडते असं म्हटलंय. आपल्या आई-वडीलांकडून हा भारतीय वारसा आपल्याकडे आल्याचं ती म्हणाली. तर अमेरिकन अॅक्ट्रेस मिंडी म्हणाली, ‘भारतात एका छताखाली विविध परंपरा जपल्या जातात ते मला फार आवडतं’.

दरम्यान लीली सिंगने अमेरिकेत आयोजित केलेल्या ह्या पार्टीची थीम ‘लव्ह अॅन्ड लाईट’ होती. तिने या सेलिब्रेशनचे अनेक फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. आणि तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘दिवाळीची ही रात्र माझ्यासाठी स्वप्नवत. एखादा सिनेमाच म्हणूया नं. ज्याची सुरुवात आणि शेवटही गोड. प्रेम आणि प्रकाश दोन्हीही आनंद देणारं. परफेक्ट इंडियन देसी तडका, जल्लोष, उत्साह आणि खूप काही’.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा