“मी कधीही मोर्चा काढणार म्हणालो नाही”, आंदोलनाबाबतच्या संभ्रमावर संभाजीराजेंचं स्पष्टीकरण!

पुणे : संभाजीराजे यांनी येत्या १६ जूनपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मात्र, हे आंदोलन नेमकं कोणत्या स्वरूपात असणार? याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. त्यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यावर संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

“कधी म्हणता मोर्चे काढणार, कधी म्हणता आंदोलन करणार. संभाजीराजे यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर करावी आणि समाजाची दिशाभूल करू नये”, असा आक्षेप चंद्रकांत पाटील होता.

त्यावर बोलताना संभाजीराजेंनी उत्तर दिलं आहे. “चंद्रकांतदादा खूप सांगत असतील. तो त्यांचा विषय आहे. त्यांच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये. आमचं धोरण सरळ आहे. मी कधीही मोर्चा म्हणालो नाही. माझ्या रायगड आणि मुंबईच्या भाषणात स्पष्ट म्हटलं आहे की आम्ही मूक आंदोलन करू. देशात आत्तापर्यंत समाज बोललाय, आम्ही बोललोय. आता लोकप्रतिनिधी बोलतील. हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोण काय बोलतंय, त्यावर मी कशाला काही बोलू?” असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा