हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर साध्वी प्रज्ञासिंहने मागितली माफी

‘हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला’, असं वादग्रस्त विधान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 मुंबई हल्ल्यात शहिद झालेले हेमंत करकरे यांच्या बद्दल केले होते. यावर आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागितली आहे.

“माझ्या वक्तव्याचा देशाचा शत्रूंना फायदा होतोय असं मला वाटत आहे. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेऊन माफी मागते”, असं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने म्हटले आहे.

भोपाळ मतदारसंघातून साध्वी प्रज्ञासिंह यांना काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.