InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पाटलांच्या पोरींना मी लावणी शिकवितो, त्यांनीही नाचलं पाहिजे : लक्ष्मण माने

“पाटलांंनी आता लावणीला जाऊन फेटा उडवण्यापेक्षा त्यांची एखादी चांगली पोरगी आमच्याकडं पाठवा, तिला मी लावणी शिकवतो, त्यांच्याही पोरींनी आता नाचलं पाहिजे”. असे वादग्रस्त विधान माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पुणे येथे ओबीसी आरक्षण जागरण परिषदेत बोलताना केलं.

आमच्याच पोरींनी किती दिवस नाचायच ? तुमच्यातील एखादी पोरगी माझ्याकडं पाठवा, तिला मी लावणी शिकवतो. आम्हीच काय नाचायचा ठेका घेतला आहे का ? असा प्रश्नदेखील लक्ष्मण माने यांनी केलं. यापुढे आम्ही आता कोणाला काही मागणार नाही. आम्हीच आमची सत्ता निर्माण करू.

आता आमची लोक बॅंड वाजवणार नाहीत, पाटलांचे बॅंड असले पाहिजेत. आता तुम्ही फेटे उडवू नका. तुम्ही बॅंड वाजवा. सत्तर वर्षे तुम्ही खूप खाल्ले आहे असही माने यांनी विधान केले.

महत्वाच्या बातम्या –

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply