InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“आम्ही बाबरी मशीदीचा ढाचा पाडला, आता मंदिर बांधायला जाणार”

भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर शहिद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असताना, आता त्यांनी पुन्हा एकदा बाबरी मशीद संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. मी बाबरी मस्जिद पाडली आणि आता मंदिरही बांधायला जाणार असल्याचे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले आहे.

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या की, “मी बाबरी मशीद पाडायला गेले होते, आम्ही मिळून मशीदीचा ढाचा पाडला आणि आता मंदिर बांधायलादेखील जाणार आहे. मी पूर्ण आत्मविश्वासाने बोलत आहे, कारण प्रभू श्रीराम माझे आदर्श आहेत. त्यांच्यावर माझी भक्ती आहे. राम राष्ट्र आहे, राष्ट्रही राम आहे, त्यामुळे भव्य राम मंदिर बनवण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही.” या नव्या वादग्रस्त विधानामुळे साध्वींना भोपाळमधील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अजून एक नोटीस बजावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply