‘मी २४ तासात एकदाच टॉयलेट…’, अभिजीत बिचुकलेचा विचित्र खुलासा

मुंबई : काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस १५’मध्ये अभिजित बिचूकले यांची एन्ट्री झाली आहे. घरात अभिजीत बिचुकलेची एण्ट्री होताच प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होताना दिसत आहे. दरम्यान, अभिजीत बिचुकलेने अजब खुलासा केला आहे.

‘बिग बॉस १५’च्या घरातील वॉशरुम एरियामध्ये राखी सावंत आणि अभिजीत जेवणासंदर्भात गप्पा मारताना दिसतात. राखी अभिजीतला विचारते ‘तुम्ही जास्त का जेवत नाहीत?’ त्यावर अभिजीतने दिलेल्या उत्तराने राखीसोबतच प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे.

टॉयलेटला जाणे हे फार कंटाळवाणे काम आहे असे अभिजीत म्हणाले. तसेच “२४ तासामध्ये मी एकदाच टॉयलेटला जातो आणि टॉयलेटला कमी जायला लागावे म्हणून मी कमी जेवतो” असा खुलासा अभिजीतने केला आहे. अभिजीतचे हे विचित्र बोलणे ऐकून राखी पुन्हा विचारते, “टॉयलेट जाणे तुम्हाला कंटाळवाणे वाटते?” त्यावर अभिजीत यांनी “हो, मला जेवायलाच नको”, असे म्हटले आहे. मात्र हे ऐकून काहींना धक्का बसला आहे तर काहींना राखी आणि अभिजीतमधील हा संवाद मजेशीर वाटला आहे.

दरम्यान अभिजीत बिचुकले हा ‘बिग बॉस मराठी’मध्ये होता. अभिजीत हा साताऱ्याचा आहे. अभिजीतने महापालिका ते संसदेपर्यंत निवडणूक लढवली आहे. तो स्वत:ला कलाकार, लेखक, कवी, गायक आणि कंपोजिशन मेकर म्हणवतो. तसेच अभिजीतची पत्नी ही सोशल वर्कर आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा