‘मी त्यांना वडिलांप्रमाणे समजायचे आणि त्यांनी…’; भारती सिंहचा धक्कादायक खुलासा

मुंबई : कॉमेडीयन भारती सिंह आज लोकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र, प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या भारतीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना भारती सिंह म्हणाली की, “करिअरच्या सुरुवातीला माझे वडील बाहेर असायचे मात्र माझी आई नेहमी माझ्याबरोबर असायची. ज्यावेळी मी कामासाठी सेटवर जायचे त्यावेळी कुणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचं तर कुणी कमरेवर हात ठेवायचं. मला त्यावेळी हे देखील समजत नव्हतं की हा मुलींसाठी चुकीचा स्पर्श आहे. जे समन्वयक आम्हाला पैसे द्यायचे तेच कमरेवर हात घासायचे,” असा धक्कादायक खुलासा भारतीने यावेळी केला आहे.

भारती पुढे म्हणाली की, “मला माहित होतं की ही चांगली भावना नाही. पण हे लोक माझ्या चुलत्यांच्या वयांचे होते. त्यामुळे मला वाटायचं की या लोकांच्या मनात असं काही नाही मीच चुकीची आहे. परंतु आता मला वाटतं की मी खरंच त्यावेळी मूर्ख होते, कारण या गोष्टी मी त्यावेळी समजू शकले नाही.” असा धक्कादायक खुलासा भरतीने केला.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा