InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘मला आणखी काही नको महाराष्ट्रासाठी’…’शरद पवारांचे भावनिक ट्विट.

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला एका टप्प्यात मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

- Advertisement -

Loading...

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भावनिक ट्वीट (Tweet) केले आहे. ‘मला आणखी काही नको. महाराष्ट्राने मला भरभरुन दिले आहे. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे,’ असे पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. ‘राज्यातील जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केले, देशाचा संरक्षण मंत्री केले, 10 वर्षे कृषीमंत्री केले. जनतेने मला भरभरुन दिले आहे. आता मला आणखी काही नको.’ असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.