दलालांमुळे आपल्या शेतकर्‍याची घुसमट होऊ नये अशी माझी इच्छा : नरेंद्र मोदी

 कोईम्बतूर : तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी पाहिले. पण त्यानंतरही शेतकरी बांधव शांतपणे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत.

आता यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मात्र हे आंदोलन शेतकऱ्यांचं नसून दलालांचं असल्याची टीका भाजपचे नेते करतात. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दलालांवर निशाणा साधत नवे शेतकरी कायदे शेतकऱ्यांच्या कसे फायद्याचे आहेत हे सांगितलं आहे. कोईम्बतूरमध्ये नरेंद्र मोदींची प्रचारसभा झाली त्यावेळी ते बोलत होते.

आपल्या देशातील छोट्या शेतकऱ्याने कोणावरही अवलंबून राहावं अशी आमची इच्छा नाही. मात्र दलालांमुळे आपल्या शेतकर्‍याची घुसमट होऊ नये अशी इच्छा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान किसान योजनेला कालच दोन वर्षे पूर्ण झाली. या योजनेचा कोटी शेतकर्‍यांना लाभ झाला असल्याचं मोदींनी सांगितलं. यावेळी बोलताना मोदींनी द्रमुक आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा