InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मला जनतेसाठी काम करायचं आहे, श्रेयासाठी नाही- पंकजा मुंडे

राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या बहीण भावामध्ये निवडणुकीपूर्वीच श्रेयवादावरून लढाई रंगल्याचे चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. परळी वैजनाथ येथील पंचायत समिती इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्या अगोदरच पंचायत समितीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन केले.

धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी उदघाटन केल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा शासकीय लोकार्पण केले आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या त्या लोकार्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वीच राजकीय द्वेषाचे चित्र बीड जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.

परळीची पंचायत समिती भाजपच्या ताब्यात असताना निधी मंजूर केला. नंतर ही पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. मात्र मी काम रखडविले नाही. मला जनतेसाठी काम करायचं आहे, श्रेयासाठी नाही”, असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply