मी शिवसेनेत ३९ वर्षे होतो, त्यामुळे माझ्याकडे बराच मसाला आहे, तो मी टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार !

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी भाष्य करताना अपशब्द वापरला आणि त्यानंतर झालेला गदारोळ संपूर्ण देशाने पाहिला. याआधी नारायण राणे यांना नाशिक पोलिसांनीं अटक केल्याने त्यांची जनआशीर्वाद यात्रा काही काळ स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जाणार आहेत. आजपासून राणे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर असणार आहेत.

या यात्रेमध्ये राणे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलं आहे. यावेळी रत्नागिरीत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. नारायण राणे म्हणाले की, आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं? काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार.

तसेच सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवलं आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार, असं राणे म्हणाले. सोबतच केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला? असा सवाल देखील त्यांनी केला.

दरम्यान यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केला. एखाद्या दरोडेखोराप्रमाणे मला अटक करण्यात आली. मी शिवसेनेसोबत थोडीथोडकी नव्हे, ३९ वर्षे होतो. त्यामुळे माझ्याकडे बराच मसाला आहे, असे सूचक वक्तव्य करत राणेंनी शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा