‘मला पार्टीत ग्लॅमर यावा म्हणून बोलावण्यात आले होते’ : मुनमून धमेचा

मुंबई : आज क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक आरोपी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी संपली आहे. उद्या, गुरुवारी १२ वाजता आर्यनसह अरबाज, मुनमून यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. दरम्यान आज मुनमून धमेचाच्या वकिलांनी युक्तिवाद केल्याचे पहायला मिळाले.

मूनमुनचे वकील अली काशिफ मुनमुनच्या बाजूने म्हणाले की, ‘माझ्याविरोधातली केस पूर्णपणे बनावी आहे. मला बलदेव नावाच्या इसमाने पार्टीसाठी बोलावले होते म्हणून मी गेले होते. त्याला अटक करण्यात आली नाही आणि मला अटक करण्यात आली. जर एका रुममध्ये ड्रग्स सापडले तर सगळ्यांची चौकशी व्हायला हवी होती, ती न होता मला अटक करण्यात आली. क्रूझवर १३०० लोकं होते. सोमिया नावाच्या मुलीकडे रोलिंग पेपर सापडला पण तिला जाऊ देण्यात आले. मला पार्टीत ग्लॅमर यावा म्हणून बोलावण्यात आले होते माझ्याकडे काहीही सापडले नाही.’

तसेच ‘आर्यन आणि अरबाज मुनमूनला ओळखतही नाहीत. मात्र या दोघांसोबत तिलाही अटक करण्यात आली आणि ३ तारखेला कोर्टात हजर करण्यात आले. दोघांशी निगडित जो पंचनामा झाला त्यात मुनमूनचा संबंध नव्हता,’ असे आर्यन खानचे वकील अमित देसाई म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा