“मी लवकरच आई होणार आहे, माझं ही एक कुटुंब असेल” : स्वरा भास्कर

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बेधडक आणि वादग्रस्त वक्व्यांमुळे नेहमीच चर्चेत पहायला मिळते. अशातच सध्या स्वरा आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर ही सिंगल असून तीनं आता आई होण्याचा निर्णय घेतला आहे. “मला नेहमीच एक कुटुंब हवं होतं, मुलं हवी होती. आणि आता ती वेळ आली आहे. मी लवकरच आई होणार आहे, माझं ही एक कुटुंब असेल”, असं वक्तव्य स्वरानं केलं. त्यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे.

स्वरानं आता एक मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया बरीच मोठी असल्यानं स्वरानं आतापासूनच कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे. स्वराच्या या निर्णयाला तिच्या कुटुंबाचाही पाठिंबा आहे. त्यामुळे स्वरा सध्या आनंदात आहे.

दरम्यान, ‘मी स्वतःला भाग्यवान समजते की आपल्या देशात एकट्या महिलांना मुले दत्तक घेण्याची परवानगी आहे’, असंही स्वरानं म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा