‘मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं’; फडणवीसांनी दिले संकेत

आपल्यावरील अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जोरदार भाषण केलं. मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं, त्यामुळे वाट पाहा…अशा शेलक्या शब्दात त्यांनी त्यांच्यावरील टीकेला उत्तर दिलं. “मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा, असं सांगत फडणवीसांनी पुन्हा सत्तेत येण्याचे संकेतही दिलेत. ते विधानसभा सभागृहात बोलत होते.

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यावेळी सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह सभागृहाच्या सदस्यांनी अभिनंदनपर भाषणे केली.

अभिनंदनाच्या ठरावाला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांचा शायराना अंदाजही उपस्थितांना पाहण्यास मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी, जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध आहेत. ‘जनतेकडून त्यांच्या मनात ज्या आशा, आकांक्षा, अपेक्षा आहेत; तसेच मुख्यमंत्र्यांच्याही मनातही राज्यातील जनतेविषयी काही योजना असतील, त्या सर्वांसाठी आम्ही त्यांना सहकार्य करू, असं माजी मुख्यंमंत्री देवंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.