जयंत पाटील यांच्या विरोधात मीच निवडणूक लढणार – सदाभाऊ खोत

रयत क्रांती संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तेरा जागांची मागणी केली आहे. काही जागांवर आमच्याकडे उमेदवार तयार आहेत. पण मतदारसंघ कोणते मिळतात याच्या प्रतीक्षेत आहोत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावर आम्ही दावा केला असून तो आम्हालाच मिळणार. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात मीच निवडणूक लढणार आहे, अशी घोषणा  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला दोनशेहून अधिक जागा मिळणार आहेत. त्यामुळे उर्वरित जागांसाठीच विरोधकांनी तयारी करावी, बाकीच्या दोनशे जागांचा नाद सोडून द्यावा, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

महत्वाच्या बातम्या-

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.