शेवटपर्यंत मी धनंजय मुंडेंच्या विरोधात लढणार !

राज्याच्या राजकारणात सद्या एक चर्चेचा विषय समोर आलाय. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या महिलेने केली होती.

मात्र धनंजय मुंडे यांनी हे फेसबुक पोस्टद्वारे आरोप फेटाळून लावले आहेत. 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. असं मुंडे म्हणाले.

त्यावर मात्र रेणू शर्मा यांनी ब्लॅकमेलच्या मुद्द्याशिवाय मुंडे आणखी काय बोलणार? असं सांगत आपण शेवटरपर्यंत लढणार असल्याचं म्हटलं आहे.पोलिसांनी लेखी तक्रार नोंदवून न घेतल्याबद्दलही रेणूने नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई पोलीस असो की इतर राज्यांचे पोलीस, मी सर्वांचा आदर करते. पण काही लोक त्यांच्या पदाचा फायदा उठवून पोलिसांना काम करू देत नाही, असंही रेणूने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.