‘शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी स्वत: पंतप्रधान होऊन पूर्ण करेल’

- Advertisement -
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. बिग बॉस फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजित बिचुकले यांनी देखील विधानसभेच्या 288 जागा लढणार असल्याचे सांगितले होते. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी स्वत: पंतप्रधान होऊन पूर्ण करुन दाखवेन असं आश्वासन अभिजित यांनी दिले आहे.
अभिजित बिचुकले यांनी सांगितले की, साताऱ्यातील लोकसभेची पोटनिवडणुक आणि आगामी विधानसभा या दोन्ही निवडणुकींच्या मैदानात उतरणार आहे. तसेच साताऱ्यातील नागरिकांनी शरद पवार यांना मोठं केलं असून मलाही सातारकर मोठं करतील असा अभिजित यांनी विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे शरद पवारांना देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे त्यांचे हे अपूर्ण राहिलेले स्वप्न मी स्वत: पंतप्रधान होऊन पूर्ण करुन दाखवेन असं देखील अभिजित बिचुकलेंनी यावेळी सांगितले.
Loading...
Related Posts
- Advertisement -
'झालं गेलं गंगेला मिळालं'; खोतकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करणाया रावसाहेब दानवे उपस्थित @inshortsmarathi https://t.co/rCheYt3Kyl
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) October 1, 2019
Loading...