मी कधीच शेतकऱ्यांची माफी मागणार नाही : कंगना राणौत

मथुरा : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यातच आपण कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, मात्र मी देशहितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रचार करणार आहे, असं कंगनाने शनिवारी मथुरेत म्हटलंय. मथुरेत श्रीकृष्ण जन्मस्थानाला भेट दिल्यानंतर कंगनाने पत्रकारांशी संवाद साधला.

२०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपण भाजपाचा प्रचार करणार का, असे विचारले असता कंगना म्हणाली, “मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. जे देशहितासाठी काम करत आहेत, त्यांच्यासाठी मी प्रचार करेन.” तसेच पुढे तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागणार का असा प्रश्न विचारला असता, कंगना म्हणाली कि, मी कधीच माफी मागणार नाही आणि मी माफी का मागावी. शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलले म्हणून मी माफी मागावी का? तर मी माफी मागणार नाही. तुम्ही मीडियावाल्यांनी मला दाखवा कि मी कधी कुठे माफी मागितली आहे का? असं कंगना यावेळी म्हणाली.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लोकांना भगवान श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष जन्मस्थान पाहता यावे, यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा कंगनाने व्यक्त केली. भगवान कृष्णाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी एक ईदगाह आहे, असा दावाही यावेळी कंगनाने केला.

 

 

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा