InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मी मरेपर्यंत ‘या’ शहराला विसरु शकणार नाही – अजित पवार

- Advertisement -

पिंपरी-चिंचवडमध्ये आमच्यासोबत जोवर कार्यकर्ते आहेत, तोवर कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही! मी मरेपर्यंत या शहराला विसरू शकणार नाही. मी खात्री देतो. यावेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्या. सहा महिन्यात शास्ती कर माफ केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असं सांगत अजित पवारांनी लोकांना भावनिक आवाहन केलं आहे.

रविवारी पिंपरीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेताना अजित पवार म्हणाले की, आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. वंचित बहुजनसोबत आघाडी करण्याची आमची इच्छा आहे. पुण्यात एकूण 8 विधानसभेच्या जागा आहे. त्यातील राष्ट्रवादी 4, काँग्रेस 3 आणि 1 जागा मित्रपक्षाला सोडली जाईल असं त्यांनी सांगितले. तसेच इच्छुकांची संख्या जास्त असल्याने मर्यादित लोकांनाच तिकीट देऊ शकतो असं अजित पवारांनी सांगितले.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.