InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेल”

जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेल, असा दम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये काल पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलमतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गडकरी प्रमुख पाहुणे होते. त्यावेळी ते बोलत होते.

तुमच्याइकडे जात पात किती चालते मला माहित नाही, मात्र, आमच्याकडे पाच जिल्ह्यात जात काढत नाहीत. मी सर्वांना सांगितलं आहे, जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेन, असं गडकरी म्हणाले. कोणी छोट्या जातीचा मोठ्या जातीचा राहता कामा नये, संपूर्ण समाज एक एकात्म आणि अखंड असावा असं नितीन गडकरी म्हणाले.

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.