“नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत, पण…”

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. मराठा नेतृत्व, येऊ घातलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणुक लक्षात घेता भाजपा त्यांना संधी देईल, अशी शक्यता आहे वर्तविण्यात येत आहे.

नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांवर आता शिवसेनेनही प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत म्हणाले की, नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र नारायण राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनेची कोंडी होऊ शकत नाही.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्त्व संपूर्ण जगाला दिसलेलं आहे आणि यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेना काम करत आहे. उद्धव ठाकरे यांचं कतृत्व कोणी कितीही नाकारत असलं तरी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. त्यामुळे कितीही काही केलं तरी शिवसेनेची कोंडी होऊ शकत नसल्याचं सामंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा