ICC Award 2022 | ‘क्रिकेटर ऑफ द इयर 2022’ नामांकन यादीत ‘या’ भारतीय खेळाडूला मिळाले स्थान

ICC Award 2022 | टीम महाराष्ट्र देशा: गुरुवारी आयसीसी (ICC) ने ‘क्रिकेटर ऑफ द इयर 2022’ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली आहे. या नामांकन यादीमध्ये एकूण 4 खेळाडूंची नावं आहेत. या नामांकन यादीमध्ये एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. या यादीमध्ये झिम्बावे, इंग्लंड, पाकिस्तान आणि भारत या संघातील खेळाडूंचा समावेश आहे. या यादीमध्ये मिस्टर 360 म्हणजेच सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या भारतीय खेळाडूचा समावेश आहे. सूर्यासोबत या यादीमध्ये सिकंदर रझा, सॅम करण आणि मोहम्मद रिझवान या खेळाडूंचा समावेश आहे.

2022 हे वर्ष सूर्यकुमार यादवसाठी अतिशय चांगले गेले. सूर्याने यावर्षी आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने 31 सामन्यांमध्ये तब्बल 1164 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यावर्षी टी-20 क्रिकेट मध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. ही कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. यावर्षी सूर्याने तब्बल 68 षटकार मारले आहेत.

यावर्षी झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्याने या स्पर्धेमध्ये 3 अर्धशतके लगावली होती. या स्पर्धेमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 190 च्या जवळपास होतात. तर, त्याने या स्पर्धेमध्ये सहा सामन्यात 60 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

दरम्यान, ‘इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2022’ पुरस्कारासाठी नामांकन यादीमध्ये भारतीय संघातील गोलंदाज अर्शदीप सिंग याला स्थान मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून अर्शदीपला सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला आहे. त्याने आतापर्यंत 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्याने 33 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.