InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदी सत्तेत आले तर भारत वर्ल्ड कप हरणार? क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगल्यात चर्चा

आयपीएल झालं, निवडणूकीची धामधूम संपत आली, आता चर्चा आहे ती वर्ल्ड कपची. 30 मे पासून वर्ल्ड कप सुरू होणाऱ असून या स्पर्धेत यंदा दहा संघ सहभागी होणार आहेत. भारतात सध्या लोकसभेची रणधुमाळी आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता देशातील सरकार आणि भारताची वर्ल्ड कपमधील कामगिरी यांचा संबंध दिसून आला आहे आणि लावला ही गेला आहे. यामध्ये जेव्हा देशात काँग्रेस सत्तेवर होतं तेव्हा तेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला तर ज्यावेळी एनडीए सरकार होतं त्यावेळी भारताला विश्वविजेता होता होता राहिला.

भारताने पहिल्यांदा 1983 मध्ये वर्ल़्ड कप जिंकला होता. त्यावेळी देखील देशात काँग्रेसचे सरकार होते. भारताने  फक्त 183 धावा केल्या असतानाही बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत व्हावं लागला होतं. यावेळी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सरकारी निवासस्थानी खेळाडूंचा सन्मानही केला होता.

2003 मध्ये दुसऱ्यांदा विजेता होण्याची संधी भारताला मिळाली होती. भारताने फायनलला सहज प्रवेश मिळवला. त्यावेळी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होती. परंतू या वर्ल्डकपमध्ये भारताचे विश्वविजेता होण्याचं स्वपं भंगलं होतं.

2007 मध्ये क्रिकेटमध्येही 50 षटकांच्या जागी टी20 च्या सामन्यांना सुरुवात झाली होती. देशात युपीए सरकारमध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते. संघात नव्या खेळाडूंना स्थान दिलं होतं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला.

2011 नंतर 2014 मध्ये देशात सत्ता परिवर्तन झालं. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यानंतर 2016 ला झालेल्या टी20 त सुद्धा भारताला विजेता होता आलं नाही. आताही वर्ल्ड कपच्या आधी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आता देखील या निवडणुकींच्या निकालावरच वर्ल्ड कपचा निकाल आधारित असणार का अशी चर्चा क्रिकेट चाहत्यामध्ये रंगू लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply