ICC Mens ODI Team | रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ODI संघातून वगळले, तर ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

ICC Mens ODI Team | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) ने गेल्या वर्षी म्हणजेच 2022 चा उत्कृष्ट एकदिवसीय (ODI) संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व पाकिस्तानच्या बाबर आझम (Babar Azam) कडे सोपवण्यात आले आहे. तर टीम इंडियातील रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) ला या संघात स्थान मिळाले नाही. टीम इंडियातील फक्त दोन खेळाडू या संघामध्ये स्थान मिळवू शकले आहेत. यामध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि मोहम्मद सिराज (Mohommad Siraj) या खेळाडूंचा समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंना आयसीसी ओडीआय (ICC ODI) टीम ऑफ द इयरमध्ये स्थान मिळाले आहे.

या संघामध्ये पाकिस्तानमधून बाबर आझमला घेण्यात आले आहे. तर, या संघामध्ये ऑस्ट्रेलियातील ट्रॅव्हिस हेड आणि अॅडम झाम्पा या खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि ट्रेंट बोल्ट या दोघांना संघात स्थान मिळाले आहे.

श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने गेल्या वर्षी 17 सामन्यांमध्ये 25 च्या सरासरीने 724 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि सहा अर्धशतके केली आहे. तर, मोहम्मद सिराजने देखील एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याने गेल्या वर्षात 15 सामन्यांमध्ये 23 च्या सरासरीने 24 बळी घेतले आहे. गेल्या वर्षी त्याने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

पाकिस्तानच्या बाबर आझमने 2022 मध्ये 9 एकदिवसीय सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने 2022 मध्ये 84.87 च्या सरासरीने तब्बल 679 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.