InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोंच्या ताफ्यावर माओवाद्यांचा भ्याड हल्ला, 10 जवान शहीद

गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 10 जवान आणि एक चालक शहीद झाले. माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूरखेडा गावाजवळील ही घटना आहे.

जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात 10 जवान शहीद झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे.

गस्तीवरील जवानांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या या माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटाचं लक्ष्य ठरल्या. त्यातून 25 जवान प्रवास करत होते.  कुरखेडा ते कोरची मार्गावर 6 किमी अंतरावर जांभुळखेडा गावाजवळ एका ठिकाणी हा स्फोट घडवून आणला, यात वाहनाच्या चिंधड्या उडाल्या.

माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply