“एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं”

मुंबई : गुरूवार 3 जून पासून राज्यात लॉक-अनलॉक वरून गोंधळ सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकचे पाच टप्पे पत्रकार परिषद घेत जाहीर केले. मात्र, त्यानंतर तासाभरातच राज्य सरकारकडून यू टर्न घेण्यात आला. राज्यातील निर्बंध हटवण्यात आले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन आहे असं स्पष्टीकरण राज्य सरकारने दिलं. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याच मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं, डिझास्टर मॅनेजमेंट कायद्याचा वापर करून काँग्रेस नेते आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉक जाहीर केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ते रद्द केलं. हे चुकीचं असून डिझास्टर मॅनेजमेंटचे निर्णय लागू झाले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करणं चुकीचं आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला न पटणारं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचा हा निर्णय उद्या लागू झाला तर मुख्यमंत्र्यांची नाचक्की होईल. राज्यात लॉकडाऊन आणि अनलॉक संदर्भात सुरू असलेल्या गोंधळामुळे सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे.

पुढे एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची आणि भाजपवर टीका ही करायची अशा दोन गोष्टी एकावेळी चालत नाहीत. टीका करायची टीका करा आणि सत्तेत राहायचं असेल तर सतेत राहा, वडेट्टीवार यांनी अनलॉक जाहीर केलं, तर मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा निर्णय बदल करून लागू केला, तर हा मंत्र्यांचा अपमान आहे. म्हणून दोघांपैकी एकाने राजीनामा द्यावा, असा सल्ला सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा