‘भाजपमध्ये कुणी चुकीचं वागलं तर त्याच्यावर कारवाई होतेच’

कोल्हापूर : ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सुमारे पावणे सहा कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच, त्यांचे एक बँक खातंही गोठवलं आहे. त्यात 86 लाख रुपये आहेत. मनी लाँडरिंग कायद्यानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातं आहे.

या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपकडून ईडी आणि सीबीआयच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच ईडीच्या कारवाईचं मी मनापासून स्वागत करते. राष्ट्रवादीला ईडीचा नेहमीच फायदा झालाय, असा चिमटा सुप्रिया सुळेंनी काढला होता. यावर आता भाजपने प्रत्युत्तर दिलंय.

“एकनाथ खडसे यांच्यावर सक्तवसुली संचलनालयने कारवाई सुरु केली आहे. सीडी लावायचा निर्णय आता त्यांनीच घ्यावा. मात्र, भाजपमध्ये कुणी चुकीचं वागलं तर त्याच्यावर कारवाई होतेच,” असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

तसेच, “अनिल परब यांच्या विरोधात तक्रार तयार झाली आहे. प्रो अॅक्टिव्हली स्वत:हून अॅक्शन होण्याची शक्यता आहे, आम्ही त्याची वाट पाहतोय. अन्यथा आम्ही लवकरच तक्रार करु,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा