“भाजपने बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेब देखील बेईमान झाले नसते”

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होत. अखेर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर थेट निशाणा साधला होता. तसेच त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. यावेळी मी नेतृत्व करण्यास तयार नव्हते, मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, केवळ पित्याला दिलेलं वचन म्हणून मी मुख्यमंत्री पदावर बसलोय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

यावेळी उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर का झाले?, असं भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव लोकसभा निवडणुकीचं उदाहरण देतं भाजपवर निशाणा साधला आहे. जळगाव येथे भाजपने लोकसभा निवडणुकीत चार बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यावेळी मी स्वत: भाजपकडे तक्रार केली होती.

तसेच शिवसेनेविरुद्ध बंडखोर उमेदवार देऊन भाजपने बेईमानी केली, असा गंभीर आरोप मंञी गुलाबराव पाटील यांनी भाजपवर केला आहे. इतकेच नाही, तर त्यावेळी भाजपने बेईमानी केली नसती तर ही वेळ आली नसती. पहिले बेईमान कोण हे आधी भाजपने तपासावे आणि मग बोलावे. पहिले ते बेईमान झाले नसते तर आज ते जसे म्हणत आहेत तसे उद्धव साहेब बेईमान झाले नसते, अशा जोरदार हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी भाजपवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा