‘धोनीने देश बदलला तर त्याला न्यूझीलंडच्या टीममध्ये घेऊ’

न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे वर्ल्डकपच्या बाहेर फेकला गेला. या सामन्यामध्ये संथ खेळ केल्याची टीका धोनीवर होत आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं मात्र धोनीची पाठराखण केली आहे. ाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या दोघांनाही मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत धोनीविषयी प्रश्न विचारण्यात आले.

केन विल्यमसनला एका पत्रकारानं विचारलं, की तो जर भारताचा कर्णधार असता, तर त्यानं धोनीला टीममध्ये घेतलं असतं का? यावर विल्यमसन हसत उत्तरला, “तो न्यूझीलंडसाठी खेळत नाही! पण तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे.”

पत्रकारानं आपला प्रश्न परत सांगितल्यानंतर तो म्हणाला, “अर्थातच. त्याचा अनुभव महत्त्वाच्या क्षणी फायद्याचा ठरतो. त्याची कामगिरी नेहमीच महत्त्वाची राहील. जडेजासोबत त्यानं उत्तम भागीदारी उभी केली. धोनी एक वर्ल्ड क्लास क्रिकेटर आहे. तो राष्ट्रीयत्व बदलण्याचा विचार करतोय का? तसं असेल तर आम्ही त्याची टीममध्ये निवड करायचा विचार करू.”

धोनी आक्रमकपणे खेळत नसल्याची टीका आधीच्या सामन्यांदरम्यानही झाली होती. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतरही धोनीवर टीका करण्यात आली होती. पण विल्यमसननं मात्र धोनीची पाठराखण केली. त्यानं म्हटलं, “शेवटच्या क्षणी धोनीने मॅच फिरवल्याचं आपण पाहिलेलं आहे. ही विकेट खूपच कठीण होती, इथे सोपं काहीच नव्हतं.”

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.