समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर मलिक तुमची खैर नाही, सोमय्यांचा इशारा

मुंबई : सध्या राज्यात मुंबई ड्रग्सप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात आव्हान दिले होत. वर्षभरात समीर वानखेडेला तुरुंगात पाठवणार, तुझी नोकरी जाणार, तुझा तुरुंगवास निश्चित आहे. राज्याची जनता हे सर्व पहात आहे, तुझी बोगसगिरी जनतेसमोर आणणार त्याच्या घरातले सगळे बोगस आहेत, असे आव्हान मलिक यांनी दिले होत.

तसेच, माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो, कोणत्या बापाच्या सांगण्यावरून हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे ना. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्या शिवाय मी गप्प बसणार नाही, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला होता. आता यावर भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल प्रतिक्रिया दिलीय.

कर्तव्य बजावणाऱ्या आधिकाऱ्यांवर चुकीचे आरोप करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा उद्योग ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक करीत आहेत. मंत्री असलेले मलिक ड्रग्स माफियांचे प्रवक्ते आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित करत समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागला तर नवाब मलिक तुमची खैर नाही, असा धमकीवजा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

‘‘मलिक हे राज्याचे मंत्री आहेत की नाही असा प्रश्‍न पडावा अशा पद्धतीने ते बोलत आहेत. मंत्री असूनही ते ड्रग्स माफियांचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. त्यांच्यावर ठाकरे सरकारमधील कुणीही बोलायला तयार नाही. मलिक यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील यावर बोलत नाहीत याचा अर्थ पवार व ठाकरे यांचीच भाषा मलिक बोलत आहेत, असे समजावे का’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा