‘महाराष्ट्र सोडून फडवणीस गोव्यात व्यस्त असतील, तर विरोधी पक्ष नेत्याचा चार्ज कुणाकडे द्यायला हवा?’

मुंबई : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीवरून गोव्यासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात भाजपाला मोठे धक्के बसत आहेत. भाजपच्या चार आमदारांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे गोवा प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीच्या हालचालीवरून शरद पवार व त्यांच्या मित्रांना इशारा दिला.

गोव्यात राष्ट्रवादीची तृणमूल आणि काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे, असे शरद पवार म्हणाले होते. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावे लागते, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं! असा सणसणीत टोला लगावला आहे.

यानंतर फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीने सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. हिवाळी अधिवेशनाला उपस्थित न राहिल्याने गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरे यांनीही आपला मुख्यमंत्रीपदाचा चार्ज इतरांकडे द्यावा अशा मागण्याही भाजपकडून केल्या जात होत्या. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पलटवार केलाय.

रुपाली पाटील यांनी ट्वीट करत फडणवीस यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्राच्या सोडून गोव्याच्या समस्यां मांडत आहेत. फडवणीस गोव्यात व्यस्त असतील तर विरोधी पक्ष नेत्याचा चार्ज कुणाकडे द्यायला हवा? भाजपाच्या न्यायाप्रमाणे कुणाकडे द्यायला हवा.’ असा सवाल करत रुपाली पाटील यांनी सणसणीत टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा