InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

….तरच महाविकास आघाडीत सहभागी होऊ – राजू शेट्टी

महाविकास आघाडीतील भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना कृषीमंत्री पद देण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर सत्तेत सन्मानजनक स्थान दिलं तरच सत्तेत सहभागी होऊ, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रदेश कार्यकारिणी बैठक सोलापुरात काल पार पडली. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

यामध्ये संघटनवाढीसाठी तसेच संघटनेच्या पुर्नबांधणीसाठी गाव पातळीपासून राज्यपातळी पर्यंतच्या सर्वच समित्या बरखास्त करण्याचा निर्णय राजू शेट्टी यांनी जाहीर केला. अनेक लोकांचा त्यांच्या पदावरील दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. तसेच अनेक नव्या दमाच्या नेतृत्वांना संधी द्यायची आहे. पक्षाची पुनर्बांधणी करायची आहे. त्यासाठी कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं राजू शेट्टींनी सांगितलं.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.