“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, मग रातोरात मुख्यमंत्री का बदलला?”

अहमदाबाद : गुजरातच्या राजकीय वर्तुळातील मोठी घटना घडली. याघटनेचे सर्वांकडूनच आश्यर्य व्यक्त केलं जातंय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर मात्र मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांना धक्का देत एका दुसऱ्याच नावाची निवड करण्यात आली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली होती.

या सर्व घटनेवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलय. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा सवालही अग्रलेखातून विचारला आहे. कुठं काय बदलायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

तसेच, भूपेंद्र पटेल यांची निवड आमदारांकडून एकमताने झाली, पण भूपेंद्र यांनाही आपण मुख्यमंत्री होतोय हे माहीत नव्हते. गेल्या चार वर्षांत त्यांना साधे मंत्रीही केले नव्हते. ते एकदम मुख्यमंत्रीच झाले, दिल्लीहून नाव आलं आणि ते भाजपच्या विधिमंडळ पक्षाने मान्य केलं, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा