“शाहरूख खानचा मुलगा असू नाहीतर इतर कोणाचाही त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे”

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थान एनसीबीनं अटक केली आहे. त्याला नक्की कोणत्या कारणासाठी अटक करण्यात आली याची माहिती एनसीबीनं दिली आहे. आर्यनच्या अरेस्ट मेमोमध्ये याचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता थोड्याचवेळात या सगळ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना करण्यात आलीय. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

यावर आठवले म्हणाले कि, आर्यन खानला अटक व्हायला हवी, असं म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये शाहरूख खानचा मुलगा असू नाहीतर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फिल्म इंडस्ट्रीजला ड्रग्जची लागण झालेली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईही ड्रग्ज मुक्त झाली पाहिजे, रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. बिवली बलात्कारा प्रकरणात आठवलेंनी मानपाडा येथे पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यानंतर आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा