“मी सुपारीचोर आहे तर, निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती”

मुंबई : राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात नेहमी शाब्दिक युद्ध पाहायला मिळतं. त्यांनी अनेकदा एकमेकांंवर खोचक टीका केल्या आहेत. आता पुन्हा निलेश राणे आणि गुलाबराव पाटील यांच्यात टोलवाटोलवी पाहायला मिळत आहे. निलेश राणे यांच्या टीकेला गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जिल्ह्यात जी वाळू चोरी सुरू आहे, ते कलेक्शन गुलाबराव पाटील यांच्यासाठीच सुरू असेल. वाळू चोरीचे हफ्ते स्थानिक आमदार आणि मंत्र्यांकडे पुरवले जातात. गुलाबराव हे आधी पानटपरी चालवायचे, आता पालकमंत्री आहेत आणि सुपारीचोर आहेत, अशा शब्दात काही दिवसांपुर्वी निलेश राणे यांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली होती.

गुलाबराव पाटील यांनी निलेश राणे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘राणेंनी वांद्रे येथे घर बांधले तेव्हा रेती मीच पाठवली होती आणि मी सुपारीचोर आहे तर त्यांच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती हे त्यांनी आठवावे.’ अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी निलेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मंत्री गुलाबराव पाटील हे मंगळवारी पीक विमा योजनेच्या विषयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीच्या निमित्ताने आलेले होते. ही बैठक आटोपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी बोलताना त्यांना निलेश राणे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी देखील राणेंवर थेट हल्लाबोल केला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा